तिरुअनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट आहे. यातच सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी पजावनगड़ी गणपती मंदिरात पुजा करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट चाहत्यांनी यावेळी मंदिरात नारळही फोडले. १९८८नंतर पहिल्यांदा तिरुअनंतपुरममध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आलेय. त्यामुळे तेथील क्रिकेट चाहते सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत. 


ग्रीनफील्ड स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होणार आहे. आयएएनएसच्या मते गेल्या दोन दिवसांपासून तिरुअनंतपुरममध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. हवामान विभागानेही मंगळवारी दिवसभर तसेच संध्याकाळी पाच नंतर पाऊस होईल अशी शक्यता वर्तवलीये.


पौराणिक कथांनुसार अशी मान्यता आहे की पजावनगड़ी गणपती मंदिरात नारळ फोडल्यास पाऊस थांबतोय. यामुळेच तेथील अनेक भक्तांनी पाऊस थांबावा असे साकडे गणपती बाप्पाकडे घातलेय.