मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Shamra) आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)  हे दोघेही बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) मेहनत घेत आहेत. या दोघांना दुखापतीमुळे     आफ्रिका दौऱ्यावर जाता आलं नाही. (team india odi captain rohit sharma and all rounder ravindra jadeja working on his injurey at nca acedmy at Bengaluru)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितला काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. आफ्रिका विरुद्ध 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या  मालिकेत उपकर्णधार रोहित शर्माही जाणार होता. मात्र मांडीच्या दुखापतीमुळे त्याला मुकावं लागलं. मिळालेल्या माहितीनुसार रोहितला बरं होण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचा वेळ लागू शकतो.


रोहितने टीम इंडियाच्या 19 वर्षांखालील भारतीय यश धुलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा एनसीएतील फोटो आहे. अंडर 19 टीम एनसीएत कसून सराव करत आहे. अंडर 19 टीम इंडिया 23 डिसेंबरपासून यूएईत आशिया कप स्पर्धा खेळणार आहे.


तर दुसऱ्या बाजूला जाडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. जाडेजाला दुखापतीतून सावरण्यासाठी महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो.    


रोहितच्या जागी संघात प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोघे सलामीला खेळणार आहेत.