Virat Kohli | विराट वनडे कॅप्टन्सी सोडताच या 3 खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येणार?
विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार झाला. त्यानंतर आता विराट टी 20 पाठोपाठ वनडे टीमचीही कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई : विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार झाला. त्यानंतर आता विराट टी 20 पाठोपाठ वनडे टीमचीही कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा आहे. विराट कॅप्टन्सी सोडताच टीम इंडियामधील काही खेळाडूंची कारकिर्द धोक्यात येऊ शकते. कारण विराटनंतर रोहित शर्मा वनडे टीमचा कर्णधार होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे रोहित कर्णधार होताच तो त्याच्या काही मर्जीतल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. (team india odi captain virat kohli bhuvneshwar kumar yuzvendra chahal and mohammed siraj)
या 3 खेळाडूंची कारकिर्द धोक्यात
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सर्वोत्तम स्विंग बॉलर्सपैकी एक आहे. मात्र गेल्या काही काळापासन त्याला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
दुखापतूीमुळे आणि संघातून बाहेर असल्याचा परिणाम हा भुवीच्या कामगिरीवर होताना दिसतोय. निराशाजनक कामगिरीनंतरही विराटने त्याच्या नेतृत्वात भुवीला सातत्याने संधी दिली आहे. मात्र रोहित कर्णधार झाल्यास भुवनेश्वरला वारंवार संधी मिळेल का, याबाबत शंकाच आहे.
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा विराटच्या खास खेळाडू आहे. चहलला टी 20 वर्ल्ड कपमधूनही डच्चू देण्यात आला होता. त्याच्या जागी राहुल चाहरला संधी देण्यात आली होती. राहुल गेल्या काही काळापासून आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळतोय. त्यामुळे रोहित वनडे कॅप्टन होताच राहुलला संधी देऊ शकतो. त्यामुळे चहलची कारकिर्द धोक्यात येऊ शकते.
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
मोहम्मद सिराजही विराटच्या अगदी जवळचा समजला जातो. तसेच आयपीएलमध्ये विराट आणि सिराज एकाच टीमसाठी खेळतात. विराटने अनेकदा सिराजला संधी दिली आहे. सिराजने कसोटी संघातील स्थान निश्चित केलेलं आहे. सिराजने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती.
त्यामुळे टी 20 क्रिकेटमध्ये त्याला पुनरागमन करण्याची संधी होती. मात्र आता रोहित टी 20 संघाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वात टी 20 मध्ये किती संधी मिळते, याकडे लक्ष असेल.