Team India World Cup Jersey : एशिया कप स्पर्धेनंतर टीम इंडिया (Team India) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवली जाणार असून यंदा भारतात ही स्पर्धा होणार आहे टीम इंडिया विश्वचषकात विजयाच्या निर्धाराने उतरेल. गेल्या दहा वर्षात टीम इंडियाने एकही आयसीसी ट्ऱॉफी (ICC Trophy) जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाची विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास रचणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला बलाढ्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर सर्वांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या जर्सीचे फोटो लीक
त्याआधी टीम इंडियाच्या विश्वचषकासाठीच्या नव्या जर्सीचे (Team India Jersey) फोटो लीक झाले आहेत. ज्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत जर्सीवर बीसीसीआयचा लोगो दिसत अतून त्यावर दोन स्टार आहेत. टीम इंडियाच्या जर्सीचं अधिकृत लाँचिंग अद्याप करण्यात आलेलं नाही. पण याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या जर्सीच्या फोटोत दोन स्टार का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. कारण एशिया कपसाठीच्या भारतीय टीमच्या जर्सीवर तीन स्टार आहेत. 


जर्सीवर दोन स्टार का?


टीम इंडिया एकदिवसीय म्हणजे 50 षटकांचा विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने दोनदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा विश्वचषक पटकावला. त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. याचं प्रतिक म्हणून टीम इंडियाच्या जर्सीवर दोन स्टार आहेत. शिया कपच्या जर्सीवर असलेला तिसरा स्टार महणजे 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्याचा आहे. 



वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहममद शमी, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर


वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक
8 ऑक्टोबर : भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर : भारत vs अफगाणिस्तान, नई दिल्ली
14 ऑक्टोबर : भारत vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर : भारत vs बांग्लादेश, पुणे
22 ऑक्टोबर : भारत vs न्यूजीलँड, धर्मशाला
29 ऑक्टोबर : भारत vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर : भारत vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर : भारत vs साउथ अफ्रीका, कोलकाता
12 नोव्हेंबर : भारत vs नीदरलँड्स, बंगळुरु