हिवाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावावं की नाही? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Winter Skin Care Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावावं कि नाही हा प्रश्न सध्या अनेकांना पडतो. तेव्हा हिवाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात.   

| Dec 30, 2024, 20:51 PM IST
1/7

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देखील त्वचा UV किरणांमुळे प्रभावित होऊ शकते. अशामध्ये तुम्ही या दरम्यान त्वचेवर सनस्क्रीन लावल्यास त्वचेवर कवच तयार होते. हे कवच तुम्हाला UV किरणांपासून वाचवते.   

2/7

हिवाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन हे मॉइस्चराइजर म्हणून देखील काम करते. ज्यामुळे तुमची त्वचा ही केवळ उन्हापासून नाही तर ड्राय होण्यापासून सुद्धा सुरक्षित राहते.    

3/7

सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन कँसरचा धोका दूर होतो. याशिवाय जर तुम्ही नियमित सनस्क्रीन क्रीम वापरत असाल तर तुमची त्वचा ही चांगली राहते. जर कोणत्याही व्यक्तीने हिवाळ्यात दररोज त्वचेवर सनस्क्रीन वापरलं तर त्वचा तरुण दिसू लागते.   

4/7

हिवाळ्याच्या काळात सनस्क्रीनच्या माध्यमातून त्वचेचा टोन तसाच राखता येतो. त्याच्या रोजच्या वापराने पिगमेंटेशनची शक्यता कमी होते.   

5/7

हिवाळ्याच्या काळात सनस्क्रीनच्या माध्यमातून त्वचेचा टोन सारखा राखण्यास मदत होते.  त्याच्या रोजच्या वापराने पिगमेंटेशनची शक्यता कमी होते.   

6/7

सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. सनस्क्रीनच्या वापरामुळे त्वचा काळी पडत नाही. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणत्याही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचा त्वचेवर वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)