दुबई : आयसीसीने आज टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. ज्यामध्ये फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर भारताचा कर्णधार विराट कोहली कायम आहे. पहिल्या दहामध्ये इतर दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र नवव्या स्थानावर घसरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने 886 गुणांसह दुसरे स्थान कायम ठेवले तर चेतेश्वर पुजाराने (766) आणि अजिंक्य रहाणेने (726) गुणांसह आठवा व दहावा क्रमांक कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे.



गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह एक स्थान खाली घसरला असून तो नवव्या स्थानावर आला आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाने तिसरे स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि कर्णधार जो रूट यांनी अनुक्रमे सातवे व नववे स्थान कायम राखले आहे. 



साऊथॅम्प्टन येथे अनिर्णित कसोटीनंतर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट पाचव्या क्रमांकावर कायम आहे. तर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसनच्या अनुभवी वेगवान गोलंदाजी जोडीलाही याचा फायदा झाला.