Champion Trophy पूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज, पण रोहित शर्मानेच दिला किंग कोहलीला `जोर का झटका`
ICC Odi Rankings: चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वनडे रँकिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असल्याचं पहायला मिळतंय.
Men's odi Batting rankings : श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने लाजीरवाणी कामगिरी करत सर्वांनाच धक्का दिलाय. टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध एक वनडे सामना जिंकता आला नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन्ही स्टार प्लेयर संघात असताना देखील टीम इंडियाला किरकोळ अशा श्रीलंकेचा पराभव करता आला नाहीये. त्यामुळे आता रोहित आणि विराट यांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आता श्रीलंकेविरुद्ध जरी भारतीय संघ हरला असला तरी देखील संघाला गुड न्यूज मिळाली आहे. आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीला मोठा धक्का बसलाय.
टीम इंडिया ऑन टॉप
टीम इंडियाला 27 वर्षांनंतर श्रीलंकेकडून मात खावी लागली. परंतू टीम इंडिया अजूनही आयसीसी रँकिंगनुसार अव्वल स्थानी आहे. 5298 पाईंट्स आणि 118 रेटिंगसह टीम इंडिया 45 सामन्यानंतर टॉपवर आहे. तर दुसऱ्या स्थानी 116 रेटिंगसह कांगारू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. तसेच 112 रेटिंगसह साऊथ अफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच पाकिस्तान देखील चौथ्या स्थानावर दबक्या पावलांनी पोहोचलाय. रँकिंगनुसार टीम इंडियानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत.
रोहितने दिली विराटला धक्का
टीम इंडिया वनडे मध्ये का बाप असते? याचं उत्तर तुम्हाला आयसीसी रँकिंगमधून मिळू शकतं. टॉप 5 वनडे फलंदाजांमध्ये तीन भारतीय फलंदाज आहे. वनडे रँकिंगच्या टॉपवर सध्या पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आहे. तर टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. तर कॅप्टन रोहित शर्माने चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतलीये. तर विराट कोहली याची रँकिग तिसऱ्या स्थानावरून घसरून चौथ्या स्थानी आली आहे. 763 रेटिंगसह रोहितने दुसऱ्या स्थानी उडी मारलीये. तर विराटची रेटिंग 752 पाईंट्स इतकी आहे.
कुलदीपची मारुती उडी
गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये साऊथ अफ्रिकेचा केशव महाराज अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड आणि अँडम झॅम्पा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसर्या स्थानावर कायम आहे. तर टीम इंडियाचे धुरंदर कुपदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे प्रत्येकी 662 रेटिंग आहे आणि दोघंही चौथ्या स्थानी आहे. कुलदीप यादवने रँकिंगमध्ये मोठी 4 स्थानांची मारुती उडी घेतलीये. तर जसप्रीत बुमराह याला मोठा धक्का बसला असून त्याला तीन स्थानांची घसरण झालीये.