Rohit Sharma | विराटच्या कॅप्टन्सीपासून दुर्लक्षित, आता रोहितच्या नेतृत्वात हा बॅट्समन निवृत्ती घेणार?
रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र अशा एका ओपनर बॅट्समनकडे विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असल्यापासून दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
मुंबई : रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटचं नेतृत्व (Team India Captain) आहे. रोहितने आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र अशा एका ओपनर बॅट्समनकडे विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असल्यापासून दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा खेळाडू रोहितच्या कॅप्टन्सीत वैतागून निवृत्तीची घोषणा करु शकतो. या खेळाडूला गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून डावळण्यात आलंय.
(team india opener batsman murli vijay has not given chance in test cricket to more than 3 years)
मुरली विजयला (Murli Vijay) प्लेइंग इलेव्हनमध्ये गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून संधी मिळालेली नाहीये. मुरली विजय अखेरचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थमध्ये 14 डिसेंबर 2018 मध्ये खेळला होता. मात्र त्यानंतर मुरलीचा निवड समितनीने एकदाही विचार केला नाही.
मुरली एकेकाळी टीम इंडियाच्या भरोशाचा खेळाडू होता. मुरलीने टीम इंडियाला अनेकदा अपेक्षित आणि आक्रमक सुरुवात देण्यात मोठी मदत केली होती. मात्र यानंतर टीम इंडियामधील अनेक युवा ओपनर खेळाडूंमुळे मुरलीला संधी मिळालीच नाही. मुरलीचं आता टीममध्ये कमबॅक होणं अवघडचं झालंय, कारण मुरलीने सराव करणंही बंद केलंय.
मुरलीची क्रिकेट कारकिर्द
मुरलीने 61 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 982 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतकांचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की मुरलीने 3 हजार 982 या एकूण धावांपैकी किमान 1200 धावा या फक्त शतकांच्या मदतीनेच केल्या आहेत.