मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला सिडनी येथे सुरु असलेल्या सराव सामन्यात दुखापत झालीय. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या फलंदाजाचा झेल पकडताना सीमारेषेजवळ शॉच्या पाय मुरगळला आणि तो मैदानात पडला. त्याला मैदानातून उचलून नेले. पृथ्वी शॉला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलंय.


शॉचं अर्धशतक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल आऊट झाल्यानंतर पृथ्वी शॉनं भारतीय इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. अर्धशतक लगावून शॉनं त्याचं पहिल्या टेस्ट मॅचमधलं स्थान आणखी मजबूत केलं. पृथ्वी शॉनं ६९ बॉलमध्ये ११ फोरच्या मदतीनं ६६ रन केले. पृथ्वी शॉला लेग स्पिनर डॅनियल फॉलिन्सनं बोल्ड केलं. फॉलिन्सच्या बॉलिंगवर पृथ्वी शॉनं स्विप मारण्याचा प्रयत्न केला यामध्येच त्याला विकेट गमवावी लागली.


भारत मजबूत स्थितीत


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या एकमेव सराव सामन्यामध्ये भारतीय बॅट्समननी शानदार कामगिरी केली आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंड(एससीजी)वर सुरु असलेल्या या मॅचमध्ये पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकं केली आहेत. या तिघांच्या अर्धशतकामुळे या सराव सामन्यात भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.


खराब सुरुवात


या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया-११ चा कर्णधार सॅम व्हाईटमॅननं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंगला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉसोबत बॅटिंगला आलेला केएल राहुल सहाव्या ओव्हरमध्ये कोलमॅनच्या ओव्हरला मॅक्स ब्रायंटला कॅच देऊन आऊट झाला. राहुल आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर फक्त १६ रन होता. राहुलनं १८ बॉलमध्ये ११ रन केले.


पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम ३५८ रनवर ऑल आऊट झाली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया-११ चा स्कोअर २४/० एवढा होता. या चार दिवसांच्या सराव सामन्यानंतर ६ डिसेंबरपासून पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. ४ टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट मॅच ऍडलेडमध्ये खेळवली जाईल.