नवी दिल्ली : श्रीलंकेच्या मैदानावर टीम इंडिया बांगलादेशला भिडणार आहे. टीम इंडियाला विजयाची खात्री असली तरी चांगला खेळ करण्याचे आव्हान आहेच. शिखर धवनचे मोठ आव्हान बांगलादेशी टीम समोर आहे.


टीम इंडियाशी टक्कर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झालेला वाद साऱ्या जगाने पाहिला. लंकेला हरविल्यानंतर बांगलादेशच्या प्लेअर्सनी त्यांना नागिण डान्स करत डिवचले. श्रीलंकेची टीम या मालिकेतून बाहेर गेलीय.



तुर्तास तरी ही भांडण थांबली आहेत. आता बांगलादेशची गाठ बलाढ्य टीम इंडियाशी आहे. धवनला लवकरात लवकर बाद करण्याकडे बांगलादेशी टीमचं लक्ष्य असणार आहे.



धवनची देहबोली  


धवनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याची देहबोली लक्षात येते. त्याच्या चालण्याची स्टाईल विरोधकाच्या मनात धडकी भरविण्यासारखी आहे. जीममध्येही तो जीवतोड मेहनत घेतोय. 


या मालिकेत ४ मॅचमध्ये १८८ रन्स बनविले. याची बॅट तळपली तर भारताचा विजय वेळेआधीच होईल एवढ नक्की.