Sanju Samson: टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. या ठिकाणी आता टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता भारताला शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली वनडे सिरीज खेळायची आहे. दरम्यान टी-20 सिरीजच्या तिन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे इतर खेळाडू संजूसोबत खेळतायत मात्र यामध्येही त्याला संधी देत नाहीत.


गिल, पंत आणि सिराजने केलं इग्नोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसनला गेल्या काही दिवसांपासून इग्नोर केलं जातंय. टी-20 सिरीज दरम्यान देखील असं पहायला मिळालं. यावरून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी संताप देखील व्यक्त केला. तर नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रॅक्टिस सेशनमध्येही खेळाडूं संजूला इग्नोर करताना दिसतायत.


या व्हिडीओमध्ये संजू सॅमसन, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज एकमेकांसोबत खेळताना दिसतायत. हे चौघं जणं बॉलशी खेळत आहेत आणि हवेत उडवून एकमेकांकडे बॉल पास करतायत. यावेळी बॉल सर्वांकडे जातो मात्र संजूकडेच पास देत नाही. हा व्हिडीओ पाहून संजूचे फॅन पुन्हा एकदा निराश झालेत.



संजूच्या निवडीबाबत हार्दिकचे स्पष्टीकरण


सॅमसनला संधी न मिळाल्याबद्दल कर्णधार हार्दिक पंड्यानेही भाष्य केले आहे. अजून बराच वेळ आहे आणि सर्वांना संधी मिळेल आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना खूप मोठी संधी मिळेल, असे हार्दिकने म्हटले आहे. तसेच संजूच्या जागी असणे खूप अवघड आहे आणि मी स्वतःला त्याच्या जागी असण्याचाही विचार करू शकतो. मात्र दुर्दैवाने विविध कारणांमुळे त्याला स्थान मिळू शकले नाही, असेही हार्दिक म्हणाला.


त्याला वाईट वाटले तर तो माझ्याशी बोलू शकतो - हार्दिक पंड्या


"अशा बाबतीत खेळाडूंना उत्तर द्यायला मी  किंवा खुद्द प्रशिक्षक नेहमीच तयार असतो. कोणाला काही चुकीचे वाटले तर ते स्वतः माझ्याशी पुढे येऊन बोलू शकतात. मी त्यांच्या भावना समजू शकतो. संजू सॅमसनला स्थान न मिळणे दुर्दैवी आहे. आम्हाला त्याला खेळवायचे होते पण काही धोरणात्मक कारणांमुळे तो खेळू शकला नाही. त्याच्या जागी आणखी कोणीही असते तरीही मी समजू शकलो असतो. पण हे करावे लागतेच आणि त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलायला नेहमीच तयार आहे. जर त्याला वाईट वाटत असेल तर तो माझ्याशी किंवा प्रशिक्षकाशी बोलू शकतो. मात्र मी कर्णधारपदी राहिलो तरी या बाबतीत माझा हा विचार कायम असेल," असेही हार्दिकने म्हटले आहे.