श्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत.
आपल्या धमाकेदार फलंदाजी आणि शानदार गोलंदाजीने संघात स्थान मिळाविलेल्या हार्दिक पांड्याने आपील स्टाईलिश लूकमध्ये दिसला आहे. आपल्या नव्या हेअर स्टाईलचा लूक इस्टाग्रामवर टाकला आहे.
हार्दिक पांड्यासोबत अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि केएल राहुलनेही हेअर स्टाईल बदलली आहे. सुप्रसिद्ध आलिम हाकिम यांनी सर्व खेळाडूंचा लूक बदलला आहे.
हार्दिक पांड्याने हेअर स्टाइलिस्ट हाकिमचे कौतुक करताना म्हटले की हा जादुगर आहे. हार्दिकच्या फोटोमध्ये आलिम हाकिम दिसत आहे.