गांधीनगर :  गुजरातमध्ये (Gujarat Assembly Result 2022) पुन्हा एकदा भाजपचाच (Bjp) विजय झालाय. भाजपचे गुजरातमध्ये यंदा 150 पेक्षा जास्त जिंकले आहेत. गुजरातने भाजपला एकहाती सत्ता दिलीय. तसंच काँग्रेसला मोठं नुकसान झालंय. तर आपचं खातं उघडलंय. दरम्यान या निवडणुकीत टीम इंडियाच्या (Team India) स्टार ऑलराउंडर क्रिकेटच्या पत्नीचा विजय झालाय. रवींद्र जाडेजाची पत्नी (Ravindra Jadeja Wife) रिवाबाचा दणदणीत विजय झालाय.  रिवाबा जाडेजचा शानदार विजय झालाय. रिवाबा जामनगर उत्तर (Jamnagar North) मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात होती. रिवाबा विजयी झाल्याने आनंद व्यक्त केलाय. (team india ravindra jadeja wife rivaba jadeja win in jamnagar north constituecny gujarat assembly election 2022)
 
रिवाबा मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर होती. रिवाबाने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखली आणि विजय मिळवला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,  14 व्या फेरीतील मतमोजणीपर्यंत रिवाबाला 56 टक्के मतं मिळाली होती. रिवाबाला या दरम्यान 72 हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. तर दुसऱ्या बाजूला आम आदमी पार्टीच्या करशनभाई यांना 29 हजार मत मिळाली. तर काँग्रेसच्या बिपेंद्र सिंह जडेजा यांना 19 हजार 678 इतकी मतं मिळाली. 


मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार


"ज्यांनी माझा आनंदाने उमेदवार म्हणून स्वीकार केला. माझ्यासाठी काम केलं आणि जनतेपर्यंत पोहचवलंत त्या सर्वांचे मी आभारी आहे. हा केवळ माझा विजय नाही, तर तुमच्या सर्वांचा विजय आहे", अशी प्रतिक्रिया रिवाबाने विजयानंतर दिली. दरम्यान 12 डिसेंबरला भूपेंद्रसिंह पटेल हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.