कांगारूंना लोळवल्यावर धोनीनं एअरपोर्टच्या जमिनीवरच झोपला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनी विजय झाला आहे.
चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच ५ वनडेच्या सीरिजमध्ये भारतानं १-०ची आघाडी घेतली आहे. या विजयानंतर दुसरी वनडे खेळण्यासाठी भारतीय संघ कोलकत्याला रवाना झाला आहे. ईडन गार्डन मैदानावर दुसरी वनडे २१ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
कोलकत्याला जात असताना भारतीय टीम रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळाली. धोनीतर चक्क विमानतळाच्या जमिनीवरच झोपलेला पाहायला मिळाला. धोनी झोपलेला असताना त्याच्या बाजूला विराट कोहली, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या बसलेले होते.
भारताच्या पहिल्या वनडेतल्या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी. भारताची अवस्था ८७/५ अशी असताना हार्दिक पांड्याच्या ६६ बॉल्समध्ये ८३ आणि धोनीच्या ८८ बॉल्समध्ये ७९ रन्समुळे भारतानं ५० ओव्हरमध्ये २८१ रन्सपर्यंत मजल मारली.
त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ ओव्हरमध्ये १६४ रन्स आवश्यक होत्या. पण भारतीय बॉलर्सनी कांगारूंना जोरदार धक्के देत २१ ओव्हरमध्ये १३७/९ रन्सवर रोखलं. भारताच्या चहालनं ३ तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.