मुंबई : यंदाचा टी-20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळला जाणार आहे. यावेळी 16 टीम्सचा यामध्ये सहभाग असून सर्व टीम्सची तयारी जवळपास झाली आहे. पण सध्याच्या घडीला टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलंय. अशातच एक स्टार खेळाडू फॉर्ममध्ये नसणं ही टीम इंडियाची समस्या कायम आहे. हा खेळाडू टी-20 वर्ल्डकपपूर्वी दोन्ही सराव सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. अशा परिस्थितीत हा खेळाडू कर्णधार रोहित शर्मासाठी मोठी डोकेदुखी ठरतोय.


या खेळाडूची कामगिरी खराब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या प्रॅक्टीस सामन्यांमध्ये ऋषभ पंत फ्लॉप ठरला. फलंदाजीमध्येही त्याला चांगला खेळ करता आला नाही. यावेळी पहिल्या सामन्यात त्याने 6 रन्स तर दुसऱ्या सामन्यात केवळ 9 रन्सचा पल्ला गाठला. दोन्ही सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठणं त्याला कठीण झालं.


पुढे संधी मिळणं कठीण


पंतकडून टीम इंडियाला नेहमी मोठ्या खेळीची आवश्यकता असते. जर पंतचा फॉर्म असाच राहिला तर त्याला टी-20 वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे दिनेश कार्तिक उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे पंतला वगळून टीममध्ये कार्तिकला संधी देण्यात येईल.


पंत आशिया कपमध्येही फ्लॉप


आशिया कपमध्ये देखील पंतचा फॉर्म फार खराब दिसून आला. आशिया कप दरम्यान त्याने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 20, श्रीलंकेविरुद्ध 17 आणि पाकिस्तानविरुद्ध 14 रन्स केले होते. शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमध्येही त्याला साजेसा खेळ करता आला नाही.


आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात ओपनिंगला उतरत त्याने 27 रन्स केले. एकंदरीत रेकॉर्ड पाहिला तर पंतने आतापर्यंत 164 डावांमध्ये 4328 रन्स केलेत. यामध्ये त्याची 2 शतकं आणि 22 अर्धशतकं असून त्याचा स्ट्राईक रेट 145 आहे.