Team India Schedule : टीम इंडियाच्या खेळाडूंचं शेड्यूल (Team India Schedule) यंदाच्या वर्षी खूपच बिझी असल्याचं कळतंय. यामध्ये वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल देखील भारताला खेळायची आहे. दरम्यान टीम इंडियाला (Team India) आता आगामी आयपीएलनंतर अनेक मोठ्या सिरीज खेळायच्या आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या शेड्युलमध्ये (Team India Schedule) मोठा फलटफेर होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रिमियर लीग संपल्यानंतर टीम इंडिया लगेच इंग्लंडला रवाना होणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना रंगणार आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारताला वेस्ट इंडिजच्या टीमसोबत खेळावं लागणार आहे. वेस्ट इंडिजसोबत 2 टेस्ट मॅच, 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळावी लागणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या शेड्यूलमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. 


सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यता 


क्रिकबझच्या एका अहवालानुसार, टीम इंडिया वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर 10 सामने खेळू शकते. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर टीम इंडियाला एकूण 8 सामने खेळायचे आहेत. मात्र या शेड्यूलमध्ये बदल होऊ शकतो आणि टीम इंडियाला 8 नाही तर 10 सामने खेळावे लागू शकतात. यावेळी बीसीसीआय लवकरच अजून एक सिरीज खेळण्याचा निर्णय घेऊ शकते. 


समोर आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला एकूण 5 टी-20 सामने खेळावे लागू शकतात. दरम्यान याबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान जूनमध्ये WTC फायनल खेळल्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत टीम इंडिया सिरीज खेळणार आहे. यानंतर जुलैमध्ये टीम इंडिया वेस्ट इंडिजसोबत सिरीज खेळणार आहे. तर ऑगस्टमध्ये भारत आयर्लंडशी खेळणार आहे.


कधी सुरु होणार सिरीज?


टीम इंडियाचा (Team India Schedule) वेस्ट इंडिजचा दौरा हा 10 किंवा 12 जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर या दौऱ्यानंतर टीम इंडियाला एशिया कपची देखील तयारी सुरु करायची आहे. मात्र अजून एशिया कप कुठे खेळवला जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही. 


वनडे वर्ल्डकपच्या तारखा समोर


ईएसपीएन क्रिकइंफोप्रमाणे, भारतात होणारा वर्ल्डकप (World Cup) 5 ऑक्टोबर रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. तर 2023 च्या वनडे वर्ल्डकपचा फायनल (World Cup Final) सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याची माहिती आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) रंगणार आहे.