गॉल : भारत वि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटील उद्यापासून सुरुवात होतेय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखील टीम इंडिया लंकेविरुद्ध खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा दौरा विराट कोहलीसाठी खास असणार आहे कारण नियमित कर्णधार म्हणून २०१५मध्ये पहिली मालिका श्रीलंकेतच झाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सात मालिका जिंकल्यात. त्यामुळे सलग आठवी मालिका जिंकण्यासाठी विराट आणि ब्रिगेड सज्ज झालीये.


टेस्ट सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसलेत. ज्यामुळे विराट कोहली चिंतेत आहे. एका त-हेने भारताने शून्यावरच दोन विकेट गमावल्यात. कसं ते घ्या जाणून...


पहिली विकेट मुरलीची 


क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये सलामीची जोडी महत्त्वाची असते. कारण धावांचा पाया तेथे रचला जातो. मात्र पहिल्या टेस्टमध्ये मुरली विजय दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आलीये.


दुसरी विकेट लोकेश राहुलची


एकीकडे मुरली विजय पहिल्या टेस्टमधून बाहेर असतानाच टीम इंडियाला लोकेश राहुलच्या रुपाने दुसरा धक्का बसलाय. तापामुळे लोकेश पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाहीये.