मुंबई : ५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांऐवजी रिशभ पंत आणि कुलदीप यादवला स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेच राहणार आहे.


भारतीय संघ : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रिशभ पंत, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक