T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आज सुपर ८ मध्ये भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात भारताने ५० रन्सने बांगलादेशाचा धुव्वा उडवला. या विजयाने भारताने सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत उत्तम कामगिरी करत बांगलादेशचा पराभव केला. भारताकडून फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने अप्रतिम खेळी खेळली आणि नाबाद अर्धशतक झळकावलं. तर दुसरीकडे गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 196/5 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकांत केवळ 146/8 रन्स करता आले. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक म्हणजेच 40 रन्सची खेळी केली.


टीम इंडियाने बांगलादेशाला १९६ रन्सचं लक्ष्य दिलं होतं. १९७ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात झाली. ओपनिंगला आलेल्या लिटन दास आणि तनजीद हसन यांनी पहिल्या विकेटसाठी ३५ रन्सची पार्टनरशिप केली. मात्र हार्दिक पंड्याने 5व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर लिटन दासची विकेट काढली. दासने 10 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. त्यानंतर 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने बाद झालेल्या तनजीद हसनच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली. तनजीदने 31 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशाच्या फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही.


भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. त्याने 4 ओव्हर्समध्ये केवळ 19 रन्स दिले. याशिवाय अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनीही 2 विकेट्स घेतले.


टीम इंडियाची बांगलादेशाविरूद्ध उत्तम फलंदाजी


या सामन्यात टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 5 विकेट्स गमावून 196 रन्स केल्या. यावेळी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विराट कोहलीने 28 चेंडूत 37 धावा, ऋषभ पंतने 24 चेंडूत 36 धावा आणि शिवम दुबेने 24 चेंडूत 34 धावा केल्या. तर सलामीला कर्णधार रोहित शर्माने 11 चेंडूत 23 धावा केल्या. याशिवाय हार्दिक पंड्याने 27 चेंडूत नाबाद 50 धावा करत अर्धशतक पूर्ण केले.