मुंबई : टीम इंडिया (Team India) जूनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (World Test Championship Final 2021) आमनेसामने भिडणार आहेत. हा अंतिम सामना 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताने अंतिम फेरीत पोहचण्यासाठी गेल्या 2 वर्षात जोरदार मेहनत केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज (Ravichandran Ashwin) रवीचंद्रन अश्विनचं मोठं योगदान आहे. अश्विनला या अंतिम सामन्यात आयसीसी टेस्ट रॅंकिंगमधील ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 बॉलर (Pat Cummins) पॅट कमिन्सला पछाडण्याची नामी संधी आहे. (team india Spinner Ravichandran Ashwin has the opportunity to record the most wickets in the world test championship after beating Pat Cummins)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा किर्तमान करण्याची संधी आहे. सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पॅट पहिल्या क्रमांकावर आहे. पॅटला मागे टाकण्यासाठी अश्विनला केवळ 4 विकेट्सची आवश्यकता आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास तो हा किर्तीमान करु शकतो. पॅट कमिन्सने या स्पर्धेतील 14 सामन्यात आतापर्यंत 70 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनने 13 कसोटींमध्ये 67 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर न्यूझीलंडचा आघाडीचा गोलंदाज टीम साऊथीने 10 सामन्यांमध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.  


अश्विनची धमाकेदार कामगिरी


अश्विनने या स्पर्धेत 4 वेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या आहेत. अश्विनने भारतात 9, ऑस्ट्रेलियात 3 आणि न्यूझीलंडमध्ये 1 सामना खेळला आहे. अश्विनने भारतात 52 आणि परदेशात 15 विकेट्स घेतल्या आहेत.     


अश्विनने घेतलेल्या 52 विकेट्सपैकी 32 विकेट्स हे या वर्षातील 4 कसोटी मालिकांमध्ये घेतल्या आहेत. विशेष म्हणजे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने बॉलिंगसह बॅटिंगनेही शानदार कामगिरी केली होती. त्यासाठी अश्विनला 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारने गौरवण्यात आले होते. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अश्विनकडून टीम इंडियाला अशाच जोरदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.