मुंबई : टीम इंडियाचा (Team India) अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन (R Ashwin) कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम प्रस्थापित करतोय. अश्विनने धक्कादायक खुलासा केला आहे. एक वेळ अशी आली होती की, तेव्हा मला 5-6 बॉल टाकल्यानंतर (R Ashwin breathing problem)  दम लागायचा, असा धक्कादायक खुलासा अश्विनने केला आहे. मात्र मी आता यातून सावरलोय अस अश्विनने स्पष्ट केलंय. (Team india spinner ravichandran ashwin speaking on breathing problem during to bowling)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विन काय म्हणाला?


"2018-2020 या दरम्यान अशी वेळ आली होती की मी क्रिकेट सोडण्याचा विचार करत होतो. मी आवश्यक सर्व प्रयत्न करत होतो. मात्र माझ्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. मी जितकं प्रयत्न करायचो, तितकंच अपयशी ठरत होतो", अशी खंत अश्विनने व्यक्त केली. 


.....आणि दम लागायचा


मी 6 बॉल टाकायचो आणि मला दम लागायचा. त्यानंतर वेदना व्हायच्या. गुडघ्याचा त्रासही होऊ लागला. कंबर आणि खांदेही दुखु लागले. वाढत्या वयामुळे वजनावर नियंत्रण ठेवणं हे अवघड झालं होतं", असं अश्विनने नमूद केलं. तो एका इंटरव्यूमध्ये बोलत होता. 


अश्विनची 2021 मध्ये सुपरहिट कामगिरी


अश्विनसाठी 2021 हे वर्ष सुपरहिट राहिलं. अश्विनने 2021 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या एकूण 8 कसोटी सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या. तसेच हरभजन सिंह, वसीम अक्रम यासारख्या दिग्गज गोलंदाजांचाही विक्रम मोडित काढला. 


सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा भारतीय


अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 81 सामन्यात 427 विकेट्स घेतल्या आहेत. 


सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत अनिल कुंबळे आणि कपिल देव यांचा समावेश आहे.