मुंबई : निवड समितीने काही दिवसांपूर्वी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. तर काहींना डच्चू देण्यात आला.  शिखर धवनकडे श्रीलंका दौऱ्यावर टी 20 टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या धवनलाच वर्ल्ड कपसाठीच्या संघात स्थान देण्यात आलं नाही. तर फिरकीपटू युजवेंद्र चहललाही (Yuzvendra Chahal) संधी मिळाली नाही. दरम्यान चहलने क्रिकेट समालोचक आकाश चोप्राच्या ट्विटवर कमेंट केली आहे. (team india spinner yuzvendra chahal commented on akash chopra tweet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहलच्या या ट्विटमधून वर्ल्ड कपसाठी निवड न केल्याचा राग दिसून येत आहे. चहलचा या कमेंटद्वारे रोख निवड समितीकडे असल्याचं म्हंटल जातंय. या कमेंटमुळे चहलने सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. 


चहलचा रोख निवड समितीकडे? 


"आयपीएल 2020 च्या पहिल्या 30 सामन्यांमध्ये काही गोष्टी स्पष्ट झाल्या. यावेळसही असंच होईल. टॉस जिंकून बँटिंग करा. मध्यम गतीच्या गोलंदाजाऐवजी फास्ट बोलरला निवडा. पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये सावधपणे  बँटिंग करावी. तसेच वेगवाग स्पिनरही आपला दबदबा बनवू शकतात, सहमत आहात?" असं ट्विट आकाश चोप्राने केलं होतं.


यावर चहलने कमेंट केली. "वेगवान स्पिनर दादा?", अशी कमेंट चहलने केली. चहलची ही कमेंट आता व्हायरल होतेय. तसेच चहलने या कमेंटमधून निवड समितीवर निशाणा साधला असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. 


चहलला डच्चू, चाहरला संधी


निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी टी 20 वर्ल्ड कपसाठी चहलऐवजी राहुल चाहरला संधी दिली. निवड समितीने टीममध्ये चाहरचा प्रमुख लेग स्पिनर म्हणून संधी दिली आहे.


"आम्हाला वेगाने बॉलिंग करणारा लेग स्पीनर हवाय. आम्ही चाहरला नुकतचं वेगाने गोलंदाजी करताना पाहिलंय. आम्हाला ही असाच स्पीनर हवा होता, जो चांगल्या वेगासह ग्रीप धरु शकेल. आम्ही चहल आणि चाहर या दोघांच्या नावांवर खूप विचार केला. अखेर चाहरच्या नावाला पसंती दर्शवण्यात आली", असं चेतन शर्मा यांनी नमूद केलं. 


यशस्वी फिरकी गोलंदाज


चहलला टी 20 कप वर्ल्ड साठी संधी मिळाली नाही. मात्र चहल टीम इंडियाचा यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. चहल टी 20 मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. चहलने 49 सामन्यांमध्ये 63 विकेट्स घेतल्या आहेत. चहलचे असे दमदार आकडे असूनही त्याला संधी न मिळाल्याने क्रिकेटपटू तसेच चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.   


दोन दिवसांनंतर पुन्हा चौकार-षटकार


दरम्यान आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मे महिन्यात 31 सामन्यानंतर 14 वा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.