मुंबई : टीम इंडियाचा स्टार ओपनर 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात नेहमीच धमाल करत असतो. याशिवाय शिखर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो नेहमीच अनेक व्हीडिओ आणि फोटो शेअर करत असतो. शिखरने आणखी एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओत त्याला त्याचे वडील कानाखाली मारताना दिसत आहेत. (team india star opener gabbar shikhar dhawan father slapped him video ose viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखरने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत त्याचे वडिल महेंद्र पाल धवन आहेत. या व्हीडिओत शिखरचे वडिल त्याला कानफाटीत मारताना दिसत आहेत. व्हीडिओत "आतमध्ये फिरून येऊ का?", असं शिखरचे वडील शिखरला विचारतात. त्यावर शिखर म्हणतो, "वारँट घेऊन आला आहात का? साक्षीदार आहेत का?". यानंतर शिखरचे वडील शिखरला जोरात लावून देतात. आत जाऊन फरशी पुस असंही शिखरला सांगतात.  


शिखरचं कमबॅक


दरम्यान शिखरने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून कमबॅक केलं.  या मालिकेत शिखरने चमकदार कामगिरी केली. शिखरने  या 3 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकं लगावली. त्यामुळे शिखरला वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. वेस्टइंडिज भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विडिंज विरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.