चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाला झटका, आश्विन जखमी
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला अंतिम सामन्यापूर्वी उजव्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु ही दुखापत इतकी गंभीर नाही.
लंडन : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला अंतिम सामन्यापूर्वी उजव्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु ही दुखापत इतकी गंभीर नाही.
कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यासोबत अश्विन जेव्हा फिल्डिंग करत होता तेव्हा त्याला दुखापत झाली. फिल्डिंग कोच आर. श्रीधर कॅच प्रॅक्टीस देत असताना अश्विन खाली कोसळला.
30 मिनिटे ब्रेक झाल्यानंतर अश्विनने पुन्हा 'नी-कॅप' घालून नेटवर फलंदाजीची प्रॅक्टीस करायला आला. बराच वेळ गोलंदाजीची प्रॅक्टीस केली.