टीम इंडियाचा `हा` दिग्गज खेळाडू T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती! सुनील गावस्कर म्हणाले...
भारताच्या टी 20 क्रिकेट संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जात आहे. या वर्षाअखेरीस होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीने काही बदल केले गेले आहेत.
Team India: भारताच्या टी 20 क्रिकेट संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जात आहे. या वर्षाअखेरीस होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीने काही बदल केले गेले आहेत. मात्र असं करताना संघात अनुभवी खेळाडूकडे दुर्लक्ष केले जात आहे. अलीकडेच दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंनी टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे. परंतु आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनकडे दुर्लक्ष केले जात आहे. धवन 36 वर्षांचा असून त्याने शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघात संधी मिळालेली नाही.
2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण दिसत आहे. दक्षिण आफ्रिका मालिका आणि आयर्लंड मालिकेसाठी शिखरची भारतीय संघात निवड झालेली नाही. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही धवन यापुढे राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकणार नाही, असं सांगितलं आहे.
सुनील गावसकर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'शिखर धवनचे नाव संघात असेल असं मला वाटत नाही. त्याला पुनरागमन करायचे असते तर तो या संघात असता. पण तो या संघात नसल्याने टी-20 विश्वचषकासाठी पुनरागमन करेल असं वाटत नाही.'
शिखर धवन टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 68 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये शिखर धवनने 27.92 च्या सरासरीने आणि 126.36 च्या स्ट्राइक रेटने 1759 धावा केल्या आहेत. शिखर धवनने टी-20 क्रिकेटमध्येही 11 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, त्याने सलग 7 आयपीएल हंगामात 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.