मुंबई : टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. विराटसेना दक्षिण आफ्रिकेत तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज आहे. या कसोटी मालिकेआधी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) काही तरी स्पेशल करु, असा निर्धार केला आहे. (team india test captain virat kohli reaction about test series against south africa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट काय म्हणाला?


"अनुभव, विश्वास आणि आत्मविश्वास या तिन्ही बाबतीत आमची संघ म्हणून चांगली स्थिती आहे.  दुणावलेला आत्मविश्वास, अनुभवाच्या जोरावर आम्ही निश्चितच काही तरी विशेष करु शकतो. तसेच एक टीम म्हणून आम्हाला जे लक्ष्य गाठायचं आहे, ते नक्कीच मिळवू शकतो. तसेच सर्वात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आम्ही कसोटी मालिका जिंकू शकतो", असं विराट म्हणाला. विराटने आफ्रिका दौऱ्याआधी पत्रकार परिषद घेतली. या  पत्रकार परिषदेत तो बोलत होता. 


कसोटी मालिका जिंकण्यासाठी काय करणार? 


"आम्ही आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलो नाही. त्यामुळे आमच्यात कसोटी मालिका जिंकण्याची प्रेरणा ठासून भरली आहे. प्रत्येक दौऱ्यात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध मालिका जिंकण्याची आमची अशी मानसिकता आहे. एक कसोटी सामना इथे आणि दुसरा तिथे अशा विजयाबाबत आता आम्ही विचार करत नाही. आम्ही एक टीम म्हणून चांगली कामगिरी करु. तसेच अधिकाअधिक योगदान कसं देता येईल, याकडे अधिक लक्ष देऊ", असं विराटने नमूद केलं. 


टीम इंडियाची आफ्रिकेतील कामगिरी 


टीम इंडियाने आतापर्यंत आफ्रिका विरुद्ध आफ्रिकेत एकूण 20 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाला यापैकी केवळ 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. 


टीम इंडियाने 2018 मध्ये अखेरचा आफ्रिका दौरा केला होता. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने आफ्रिकेला कडवी झुंज दिली होती. मात्र मालिका विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. आफ्रिकाने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती.   
       
दरम्यान आतापर्यंत केवळ 3 संघानाच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा करता आलेला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या 3 संघानाच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आली आहे.