मुंबई : टीम इंडियाचा (Team India) टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडू चेतेश्वर पुजाराला (Chetshwar Pujara) श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डच्चू देण्यात आला. पुजारा गेल्या काही मालिकांपासून सातत्याने अपयशी ठरत होता. यामुळे पुजाराला टीम मॅनेजमेंटने या मालिकेतून वगळलं. इतकंच नाही,तर पुजाराला रणजी ट्रॉफीतील 3 सामन्यात फारशी छाप सोडता आली नाही. मात्र आता पुजारासाठी गूड न्यूज आहे. यामुळे पुजाराला लवकरच त्याची लय प्राप्त करु शकतो. इतकंच नाही, तर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध उर्वरित 1 कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी पुजारा निवडीसाठी आपली दावेदारीही सिद्ध करु शकतो. मात्र यासाठी पुजाराला तो ज्यासाठी ओळखला जातो, तशी कामगिरी करावी लागेल. (team india test specialist batsman cheteshwar pujara will play sussex team in country cricket championship)   
 
इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीपचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी पुजारासह करार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने टीमला दिलेल्या शब्दामुळे काउंटी टीम ससेक्ससोबतचा (Sussex)  करार मागे घेतला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ससेक्स टीममध्ये अनेक परदेशी खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. यापैकी पुजारा एक आहे. पुजारासह ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जॉश फिलिपीह करारबद्ध झाला आहे. पुजारा 2022 मध्ये ससेक्ससाठी सर्वाधिक सामने खेळेल. या स्पर्धेसाठी पुजारा वेळेत पोहचेल. 


आगामी हंगामासाठी ऐतिहासिक ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा भाग झाल्याने मी उत्साहित आहे. तसेच क्रिकेट क्लबसोबत जोडलो गेल्याने माझा सन्मान झाल्यासारखं मला वाटतंय. मी लवकरच ससेक्स कुटुंबात सामील होण्यास आणि त्याच्या समृद्ध क्रिकेट इतिहासाचा भाग होण्यास उत्सुक आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून यूकेमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा नेहमीच आनंद लुटला आहे, त्यामुळे नवीन कार्यकाळासाठी उत्सुक आहे आणि क्लबच्या यशात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे", अशी प्रतिक्रिया पुजाराने करारबद्ध झाल्यानंतर दिली.