कॅनबेरा :  टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 18 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं (Indian Cricket Team) नेतृत्व करणार आहे. तर केन विलियमसनकडे (Kane Williamson) न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवींना विश्रांती आणि युवांना संधी दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडू चांगली कामगिरी करुन संघातील स्थान निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे.   (team india tour new zealand 2022 nz vs ind 1st t 20 welington weather forecast)


वेलिंग्टनमध्ये पडणार तुफान पाऊस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्यानुसार, वेलिंग्टनमध्ये (Wellington) शुक्रवारी दिवसभर पावसाची शक्यता आहे. अॅक्यूवेदर नुसार वेलिंग्टनमध्ये आज 81 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सामना हा भारतीय वेळेनुसार 12 वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या सुरूवातीलाच पाऊस पडणार असल्याने सामना होणार की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात सांशकता आहे. मात्र 12 नंतर पावसाची शक्यता कमी कमी होत जाणार आहे. मात्र तरी देखील पाऊस पडण्याची शक्यता 49 टक्के इतकी राहणारच आहे.  


वाचा: India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त 'हेच' लोक घेऊ शकणार 


भारताची Playing 11


शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर / दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक  


टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया


हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.


टीम न्यूझीलंड


केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, ईश सोढी आणि टिम साउथी. ब्लेयर टिकनर.