केप टाऊन : टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याची सुरुवात (India Tour Of  South Africa) ही 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होत आहे. सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत आफ्रिकेत कसोटी मलिका जिंकलेली नाही. त्यामुळे विराटसेनेचा हा असा  ऐतिहासिक कारनामा करण्याचा मानस आहे. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. (team india tour of south africa bcci take guarantee over to omicrone corona variant from Csa to leave worsens)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालंय?


सध्या कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा आफ्रिकेत सर्वाधिक धोका आहे. आफ्रिकाचा हायरिस्क कंट्रीत समावेश आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ओमायक्रॉनचा धोका वाढल्यास टीम इंडियाला परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.  


ओमयाक्रॉनचा धोका वाढल्यास टीम इंडिया रद्द हा दौरा रद्द करुन मायदेशी परतू शकते, असं क्रिकेट साऊथ आफ्रिकेकडून कळवण्यात आलं आहे. 


"आफ्रिकेत ओमायक्रॉनमुळे कडक निर्बंध आहेत. शहरांसह अनेक सीमा या खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी, टीम इंडियाला भारतात परतायचं असेल, तर त्यांना पाठवण्यात येईल", असं क्रिकेट साऊथ आफ्रिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ शुएब मांजरा म्हणाले. 


आफ्रिका दौरा रद्द होणार?


"टीम इंडियाच्या खेळाडूंची सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आमची आहे. त्यांना भारतात परतायचं असेल तर तशी व्यवस्थाही केली जाईल. आम्ही सर्व पूर्वतयारी केली आहे", असं मांजरा यांनी सांगितलं.  


बीसीसीआयची भूमिका काय?


"आम्ही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात आहोत. खेळाडू पूर्णपणे सुरक्षित आहेत. या संपूर्ण दौऱ्यात कोरोनामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या शिरकावाची शक्यता आणखी कमी आहे", असं बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले.  


टीम इंडियाचा आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा मानस


टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने आफ्रिकेत आफ्रिके विरुद्ध पहिला कसोटी सामना हा राहुल द्रविडच्या नेतृत्वात जिंकला होता.


द्रविड आता टीम इंडियाचा हेड कोच आहे. आपल्या नेतृत्वात भारताला आफ्रिके विरुद्ध पहिला विजय मिळवून देणाऱ्या द्रविडला मार्गदर्शनात कसोटी मालिका जिंकवून देण्याची संधी आहे. मात्र आता या दौऱ्याचं काय होतं, हे लवकरच समजेल.