22 वर्षांच्या उमरान मलिकसाठी इरफान पठाणकडून खास गिफ्ट
उमरानच्या यशामागे इरफान पठाणचा हात, टीम इंडियात निवड झाल्यानंतर खास सेलिब्रेशन
मुंबई : जम्मू-काश्मीरचा वेगवान बॉलर उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये तुफान कामगिरी केली. आपल्या घातक बॉलिंगने त्याने दिग्गज लोकांची मन जिंकली. 152 किमी ताशी वेगाने बॉलिंग करणाऱ्या उमरानला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळाली आहे.
उमरान मलिकला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळण्यामागे इरफान पठाणचा हात असल्याची चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरिजसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतात 9 जून ते 19 जून पर्यंत 5 सामने खेळवले जाणार आहेत.
टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर उमरान मलिक खूप जास्त खूश आहे. उमरान मलिकने इरफानसोबत खास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उमरान मलिक आणि अब्दुल समदला इरफान पठाण कोचिंग देत आहे. या युवा खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम तो करत आहे. एक उत्तम कोच आणि मार्गदर्शक असल्याने त्याचा फायदा उमरान मलिकला झाला. त्याने या संधीचं सोनं आयपीएलमध्ये केलं आणि आता त्याला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळाली आहे.
इरफान पठाणने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. उमरान आणि अब्दुलसोबत इरफान पठाण आनंद साजरा करत आहे. त्याने केक कापला आणि उमरान खूप खूप शुभेच्छा असं म्हटलं आहे.