इंदूर : भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना इंदूरमध्ये होतोय. या स्टेडियमवरील आतापर्यंतच्या सर्व सामन्यांत भारताने विजय मिळवलाय. त्यामुळे या सामन्यातही विजय मिळवत भारत ही परंपरा कायम राखण्यासाठी सज्ज झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच मैदानावर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने दुहेरी शतक ठोकले होते. या मैदानावर १५ एप्रिल २००६मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने इंग्लंडला सात विकेटने हरवले होते. त्यानंतर १७ नोव्हेंबर हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. यावेळीही भारताने पाहुण्यांना ५४ धावांनी हरवले होते. 


त्यानंतर ८ डिसेंबर २०११ भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरे दुहेरी शतक झळकावले. 


मैदानावरील हा इतिहास पाहता भारत विजयाची ही परंपरा कायम राखणार की ऑस्ट्रेलिया ही परंपरा खंडित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.