नवी दिल्ली : वर्ल्ड कप 2019 ला 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. अशावेळी भारतीय क्रिकेट टीमची अधिकृत किट पार्टनर असलेल्या Nike ने टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच केली आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया हीच जर्सी घालून मैदानात उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हैदराबाद वनडे सिरीज आधीच्या पहिल्या मॅच पासून कॅप्टन कोहली आणि एमएस धोनी टीम इंडीयाच्या या जर्सीचे अनावरण केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहली आणि धोनी यांच्यासोबत महिला टीमच्या हरमनप्रीत कौर आमि जेमिमा रॉड्रिगेज या देखील यावेळी उपस्थित होत्या. याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ देखील या लॉंचिगवेळी उपस्थित होते. गेल्या 10 वर्षातील Nike ची ही बेस्ट जर्सी असल्याचे यावेळी कॅप्टन कोहलीने सांगितले. 



कपिल देवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने 1983 मध्ये सफेद जर्सीमध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या प्रेरणेतून महेंद्रसिंग धोनी आणि टीमने 2007 आणि 2011 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निळ्या जर्सीत हा खिताब जिंकला. भारतीय टीमच्या जर्सीचा वारसा आता पुढे दिला जात आहे. ही जर्सी आम्हाला मिळालेल्या वारशाची आठवण करुन देते. प्रत्येक संघाशी खेळणे आणि सर्व प्रकारात नंबर वन पोहोचणे या प्रेरणादायी तत्वाशी ही जर्सी जोडली असल्याचे एम.एस धोनीने यावेळी सांगितले. नवी जर्सी ही वर्ल्ड कपचा भाग बनेल याची आशा आहे पण आम्हाला आमच्या सातत्यावर गर्व असल्याचेही तो यावेळी म्हणाला.