Ajinkya Rahane : वेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने ( Team India ) 1-0 असा विजय मिळवला. यानंतर गुरुवारी वनडे सिरीजला ( ODI Series ) सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने ( Team India ) टेस्ट सिरीज जिंकली खरी, मात्र या सिरीजमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) ला साजेशी कामगिरी करता आली नाही. यानंतर आता पुढील टेस्ट सिरीजमध्ये अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane ) पत्ता कट होण्याची शक्यता आहे.


उपकर्णधारपदावरून अजिंक्य रहाणेचा पत्ता कट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजपूर्वी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडली होती. दरम्यान या एकमेव सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र यावेळी इतर खेळाडूंच्या तुलनेत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) ने खूप चांगली कामगिरी केली होती. परंतु त्यावेळी रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली नव्हती. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडे उपकर्णधार पद देण्यात आलं आणि रहाणे ( Ajinkya Rahane ) पूर्णपणे फ्लॉप गेलेला दिसला. त्यामुळे आगामी सिरीजमध्ये अजिंक्यचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 


वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 2 टेस्ट सामन्यांची मालिका खेळली गेली. यावेळी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. यावेळी पहिल्या टेस्ट सामन्यात अजिंक्य रहाणेला केवळ 3 रन्स आणि दुसऱ्या सामन्यात फक्त 8 रन्स करू शकला. त्याच्या या खेळीनंतर त्याच्या परफॉर्मन्सवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहेत. 


अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) ला उपकर्णधारपदावरून हटवण्यात येईल अशी जोरदार चर्चा आहे. भारताला डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 टेस्ट सामने खेळायचे आहेत. यापूर्वी जर रहाणेने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याचं उपकर्णधारपद काढून घेतलं जाऊ शकतं. इतकंच नव्हे तर टीममधून वगळण्याची टांगती तलवार देखील त्याच्या डोक्यावर आहे. 


रहाणेनंतर उपकर्णधार कोण?


जर अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदावरून वगळलं हे पद कोणाकडे जाणार असा प्रश्नही समोर येतो. यावेळी तर टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज श्रेयस अय्यरचं ( Shreyas Iyer ) नाव घेतलं जातंय. अय्यर सध्या दुखापत ग्रस्त असून आगामी टेस्ट सिरीजपर्यंत तो बरा होण्याची शक्यता आहे. अय्यरशिवाय टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) ही तोपर्यंत तंदुरुस्त होईल. त्यामुळे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) ऐवजी या दोन खेळाडूंच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.