निर्णायक 5 वी टेस्ट `या` कारणामुळे रद्द, मालिकेच्या निकालाकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष
BCCI आणि ECB च्या चर्चेनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मॅनचेस्टर : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस रद्द केला होता. परंतु आता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी टीम इंडियाचे फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जर मॅनचेस्टरमध्ये होणारा कसोटी सामना भारताने जिंकला असता तर, किंवा ड्रॉ झाला असता तरी कसोटी मालिका भारताने जिंकली असती. परंतु आता 2-2 गुणांनी बरोबरी साधली जाणार आहे. तरी मालिकेच्या निकालाबाबत अद्याप स्पष्टता नाही. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता BCCI आणि ECB च्या चर्चेनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.