मुंबई:  गुरुवारपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या क्रिकेट संघांमधील मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. अंडर १९ विश्वचषक मिळवून देणाऱ्या भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून तर पृथ्वीने त्याची ओळख प्रस्थापित केली आहेच. पण, त्यासोबतच आता खऱ्या अर्थाने वरिष्ठ खेळाडूंसोबत संघात खेळण्यासाठी त्याच्या कौशल्याची कसोटी असणार आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडियविरोधातल पहिल्या कसोटी सामन्या पृथ्वी कसोटी संघात पदार्पण करत असून, त्याला संघाच्या प्रशिक्षकांसोबतच इतर खेळाडूंचंही मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे. 


'बीसीसीआय'च्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करणयात आलेल्या व्हिडिओमध्ये खुद्द पृथ्वीच त्याचे अनुभव सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


कर्णधार विराट कोहलीसुद्धा नवख्या पृथ्वीला सर्वतोपरी संघात वावरण्यास पूरक अशी वातावरण निर्मिती करताना दिसत असून, त्याला काही कानमंत्रही देत आहे.



विराट हा मैदानावर जितक्या आक्रमक पण त्यातही संयमी खेळीचं प्रदर्शन करतो, मैदानाबाहेर तो तितकाच दिलखुलास आणि मैत्रीपूर्ण असल्याचंही पृथ्वीने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 


सुरुवातीला  पृथ्वीच्या मनावर दडपण होतं, पण रवी शास्त्री आणि विराटने त्याचं हे दडपण कमी केलं. 


संघात ज्युनिअर आणि सिनिअर खेळाडू अशी कोणतीही पद्धत नसल्याचं त्यांनी पृथ्वीला स्पष्ट केलं. त्यामुळे आता पृथ्वी या कानमंत्राच्या आणि त्याच्या खेळाच्या बळावर कसोटी सामन्यात स्वत:ला सिद्ध करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.