मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांचा टी-20 सीरीजचा शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत या सिरीजमध्ये 2-0 ने पुढे आहे. आज मुंबईत होणाऱ्या सामन्यात भारताचं ध्येय हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याचं असेल. तर श्रीलंका हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.


भारतीय संघाने कटकमध्ये श्रीलंकेला 93 धावांनी पराभूत केले होते. इंदोरमधील दुसऱ्या सामन्यात 88 धावांनी विजय मिळवत भारताने सीरिज आपल्या नावे केली.


दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याची संधी


टीम इंडियाने मुंबईमध्ये होणारा टी-20 सामना जिंकला तर टीम इंडिया आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. भारत सध्या 120 अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 124 अंकांसोबत पहिल्या स्थानावर आहे.


भारताने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी आणखी एक विजय संघाचं मनोबल वाढवण्यास मदत करेल. दक्षिण आफ्रिकेसोबत 3 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने होणार आहे.