...तर T20 World Cup टीम इंडिया उंचावणार, रोहित शर्मानं फक्त दिग्गज क्रिकेटरचा हा सल्ला ऐकावा
टीम इंडिया टी 20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ यावेळी टी 20 वर्ल्डकपसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.
Team India T20 World Cup 2022: टीम इंडिया टी 20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ यावेळी टी 20 वर्ल्डकपसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. टीम इंडियाकडे (Team India) 15 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जखमी असल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्यामुळे डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाजासाठी रवींद्र जडेजाची टीम इंडियाला उणीव भासणार आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी कर्णधार रोहित शर्मा याला एक सल्ला दिला आहे.
'टीम इंडियाकडे टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतीय संघाने सुपर 12 फेरीत चांगली कामगिरी करावी आणि उपांत्य फेरीत धडक मारावी. जर असं झालं तर भारत नक्कीच वर्ल्डकप जिंकू शकतो. बुमराह आणि जडेजाची दुखापत एका नवीन चॅम्पियनची शोधण्याची संधी देईल.', असं माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सांगितलं आहे.
'मला वाटतं आपला संघ सक्षम आहे. फक्त उपांत्य फेरीत पोहोचला तर वर्ल्डकप नक्कीच जिंकू शकतो. बुमराह आणि जडेजा संघात नसणं चिंतेची बाब आहे. पण एका नव्या चॅम्पियन मिळू शकतो', असंही रवि शास्त्री यांनी पुढे सांगितलं.
16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार असून टीम इंडियाचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबरला होणार आहे. भारताला उपांत्य फेरीत धडक मारण्याासठी सुपर 12 फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा समावेश आहे.