मुंबई :   १ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझिलंड दरम्यान टी २० सिरीजला सुरूवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहाजिकच भारतीयांना आपण जिंकावे असे वाटत असेल. भारताने या सीरिजमध्ये वर्चस्व मिळवले तरीही आपल्याप्रमाणे पाकिस्तान  टीमला याचा फायदा होणार होता. 


आयसीसी टी २० रॅकिंगमध्ये अंकांचा खेळ पाहता पाकिस्तान टीम नंबर वन होणार आहे. सध्या भारताचा पाचवा क्रमांक आहे. तर न्यूझिलंड नंबर वन आहे. 


भारताने ही सिरीज ३-० अशी जिंकल्यास भारत दुसर्‍या क्रमांकावर येईल. पाकिस्तान आपलं अव्वल स्थान  मजबूत करेल तर न्यूझिलंड पाचव्या क्रमांकावर येणार आहे.  


भारताने अजून पर्यंत टी २० मध्ये न्यूझिलंडवर विजय मिळवलेला नाही. आत्तापर्यंत सहा सामन्यांपैकी पाच सामने न्यूझिलंडने जिंकले आहेत. भारत न्यूझिलंड मधील वन डे सामन्यांमधील खेळ पाहता विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ न्यूझिलंडवर मात करेल आणि दुसर्‍या क्रमांकावर झेप घेईल असा विश्वास आहे.