राजकोट : टीम इंडीया आणि वेस्ट इंडीजमध्ये दोन कसोटी सामन्यांची सिरिज सुरु आहे. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडीयाने वेस्ट इंडीजला धूळ चारली आहे. पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा हा निकाल लागलाय. वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 196 धावात गुंडाळून एक डाव आणि 272 रन्सने मात दिली आहे. जडेजाच्या बॉलिंगवर कुलदीप यादवकडे कॅच देऊन शेनन ग्रॅब्रियलचा शेवटचा विकेट पडला. गॅब्रियलने केवळ 4 रन्स बनविले. टीम इंडीयाचा वेस्ट इंडीजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. 


विराटचा धमाका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार विराट कोहलीचा शतक झळकावण्याचा धडाका राजकोट कसोटीतही कायम राहिलेला पाहिलेला मिळाला.


त्यानं कसोटीमधील २४ वं शतक झळकावलं. २०१८ क्रिकेट मोसमातील विराटचं हे चौथं शतक आहे.  


वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही याचीच पुनरावृत्ती आली. राजकोट कसोटीत विराट नावाचं वादळ चांगलचं घोंगावलं.


त्याला रोखणं कॅरेबियन गोलंदाजांना शक्य झालं नाही. विराटच्या धडाक्यासमोर विंडीज गोलंदाजांचं काहीच चाललं नाही.


२०१८ च्या क्रिकेट मोसमात तर विराटची बॅट चांगलीच तळपलीय. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर कोहलीनं भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही.


त्यानं कर्णधाराला साजेशी खेळी केली. भारताचा धावफलक हलता ठेवला.