कटक : कटक वनडेत भारताचा ४ विकेटनं विजय झाला आहे. २-१नं भारताने ही सिरीज जिंकली आहे. विराट, राहुल, रोहितने या सामन्यात अर्धशतक ठोकले. वेस्ट इंडिजचं ३१६ धावांचं आव्हान भारताने ४ विकेट ८ बॉल राखून पूर्ण केलं आहे. कटकमध्ये विराट सेनेचा विराट विजय झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आणि केएल राहुलने टीम इंडियासाठी धमाकेदार खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२२ रन जोडले. २२ व्या ओव्हरला जेसन होल्डरने रोहित शर्माला आऊट केलं. रोहित शर्माने ८ फोर आणि एक सिक्ससह ६३ रन केले. लोकेश राहुलने ७७ रनची खेळी केली. श्रेयस अय्यर ७ रनवर तर ऋषभ पंतही ७ रनवर आऊट झाला. केदार जाधव ९ रनवर आऊट झाला.


विराट कोहलीने ८५ रनची खेळी करत भारताचा विजय खेचून आणला. रवींद्र जडेजाने नाबाद ३९ तर शार्दुल ठाकुरने नाबाद १७ रन केले. जडेजाने कोहलीसोबत महत्त्वाची ५८ रनची भागीदारी केली.


वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडियाच्या खेळाडूंनी धुव्वाधार बॅटिंग करीत भारतासमोर ३१६ धावांचं आव्हान उभं केलं. भारतानं या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. विराट कोहली. के.एल. राहुल आणि रोहित शर्माच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ४ विकेट आणि ८ बॉल राखून शानदार विजय साजरा केला. विराट सेनेनं आणखी एका शानदार विजयाची नोंद केली आहे.