ICC ODI Rankings मध्ये टीम इंडियाच्या मिताली राजचा डंका
आयसीसीने महिला वनडे क्रिकेटची (ICC ranking) क्रमवारी जाहीर केली आहे.
मुंबई : आयसीसीने महिला वनडे क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने उत्तुंग कामगिरी केली आहे. मितालीने क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतलीय. तर स्मृती मंधानाला तिचं स्थान कायम राखण्यात यश आले आहे. तर बॉलर्सच्या रॅंकिगमध्येही झुलन गोस्वामी आणि पूनम यादवनेही आपला रॅंक कायम ठेवण्यात यश मिळवलंय. (team india womens odi cricket team captain Mithali Raj reclaims No 1 position in icc odi Player Rankings)
मिताली 'अव्वल' स्थानी
मितालीला रँकिंगमध्ये 4 स्थानांचा फायदा झालाय. मितालीने थेट पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या स्थानी झेप घेतलीय. मितालीच्या नावे ताज्या आकडेवारीनुसार 762 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
तर स्मृतीला जरी रँकिंगमध्ये फायदा झाला नसला तरी, तिने तिचं स्थान कायम राखलंय. स्मृतीने 701 पॉइंट्ससह नवव्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी पाचव्या आणि पूनम यादव नवव्या स्थानी आहेत.
दरम्यान वूमन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आतापर्यंत कसोटी आणि एकदिवसीय मालिका पार पडली आहे. दरम्यान यानंतर आता 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 9 जुलैपासून सुरुवात होत आहे.