मुंबई : आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी टीम इंडियाला (Indian Cricket Team) आणखी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. आधीच ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) गुडघ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकावं लागलं आहे. त्यात बुमराह बाहेर पडल्याने भारतीय क्रिकेट संघाला 440 व्हॉल्ट्सचा झटका लागला आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. बुमराहला या दुखापतीतून सावरण्यासाठी 4-6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (team india yorker king jasprit bumrah ruled out of t20 world cup 2022 with back stress fracture bcci sources)


बीसीसीआय अधिकारी काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बुमराह निश्चितपणे टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, हे नक्की आहे. बुमराहला पाठदुखीचा त्रास आहे. त्यातून सावरण्यासाठी 4 ते 6 महिन्याचा वेळ लागू शकतो", अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सागंण्याची अटीवर दिली.
 
बुमराहला या दुखापतीमुळेच दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात खेळता आलं नव्हतं. बुमराहला सकाळी पाठीचा त्रास जाणवतोय, असं कॅप्टन रोहित शर्माने टॉसवेळेस सांगितलं होतं. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात बुमराह वर्ल्ड कपला मुकणार की काय, अशी चर्चा रंगू लागली होती. अखेर ही भीती खरी ठरलीय.


बुमराहऐवजी कुणाला संधी?


दरम्यान आता बुमराहच्या जागी टीममध्ये कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी 4 जणांचा राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या 4 जणांमध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहरचा समावेश आहे. या चौघांपैकी मोहम्मद शमीला बुमराहच्या संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र निवड समिती नक्की कुणाला संधी देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  


टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार,  हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.


स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.