Bcci Announce T20 World Cup Indian Team : एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धा आता संपल्यावर क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली ती टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) इथं टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अशातच बीसीसीआयने टी20 वर्ल्ड साठी संघा जाहीर केला आहे. (Team India Squad for T20 World Cup)
T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला एशिया कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपमध्ये त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अशात रविंद्र जडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देण्यात यावी हा प्रश्नही निवड समितीसमोर आहे.
दरम्यान, टी20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठीही आज भारतीय संघ निवडला जाण्याची शक्यता आहे.
NEWS: India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2022.
Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (WK), Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, R. Ashwin, Y Chahal, Axar Patel, Jasprit Bumrah, B Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh
— BCCI (@BCCI) September 12, 2022