मुंबई : टीम इंडिया संध्या इंग्लंडविरूद्ध वनडे सामने खेळत आहे. या वनडे मालिकेच्या प्रत्येक सामन्यात अनेक बदलाव केले जात आहेत. कधी युवा खेळाडूंना संधी दिली जाते, तर कधी सीनियर.यात युवा खेळाडूंना खुपच कमी संधी मिळत आहे. असं सर्व टीम इंडियात सुरु असताना एका य़ुवा खेळाडूने मोठा निर्णय घेतलाय.या निर्णयाने भारतीय प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मोठया टुर्नामेट सह सध्या काउंटी चॅम्पियनशिप देखील सुरु आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. त्यात आता आणखीण एका खेळाडूची भर पडलीय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आहे. हा खेळाडू आता काउंटी चॅम्पियनशिप खेळताना दिसणार आहे. 


इंग्लिश काउंटी संघ केंटने शुक्रवारी जाहीर केले की,काउंटी चॅम्पियनशिपमधील तीन आणि रॉयल लंडन कपमधील पाच सामन्यांसाठी भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला करारबद्ध केले आहे. त्यामुळे आता नवदीप सैनी केंट संघातून मैदानात उतरणार आहे. 


काउंटी क्रिकेट खेळण्याची ही एक चांगली संधी आहे आणि मी केंटसाठी माझे 100 टक्के देण्यास उत्सुक असल्याचे नवदीप सैनीने म्हटले आहे. तसेच केंटचे क्रिकेट संचालक पॉल डाऊन्टन म्हणाले, "ज्या वर्षात विकेट घेणे कठीण झाले आहे, तेव्हा नवदीपला आमच्या संघात घेऊन आम्ही खूप उत्साहीत आहोत.


दरम्यान सैनीने जूनमध्ये लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय प्रथम-श्रेणी सराव सामन्यात 55 धावा देत 3 विकेट घेतले होते. परंतु एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला नाही.


करीअर 
29 वर्षीय नवदीप सैनीने 2 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 2, 6 आणि 13 विकेट्ससह घेतले आहे. 


पाचवा भारतीय खेळाडू
चेतेश्वर पुजारा (ससेक्स), वॉशिंग्टन सुंदर (लंकेशायर), क्रुणाल पंड्या (वॉरविकशायर) आणि उमेश यादव (मिडलसेक्स) यांच्यानंतर 2022 मध्ये इंग्लिश देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी साइन अप करणारा सैनी हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.