Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या एकामागोमाग एक सीरिज खेळत आहे. इंग्लंडला नुकतंच पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र या मालिकेनंतर भारतीय संघ अनेक वर्षांनंतर झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत टीम इंडियाला आणखी एक नवा कर्णधार मिळू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वेविरुद्ध मालिका
भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे.  18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे इथं तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. या दौऱ्यात भारतीय संघाची धुरा केएल राहुल सांभाळण्याची शक्यता आहे. 


6 वर्षांनंतर दौरा
ही मालिका आयसीसी विश्वचषक सुपर लीगचा भाग आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या 50  षटकांच्या विश्वचषकात पात्र ठरण्याासाठी झिम्बाव्बेसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. झिम्बाब्वे सध्या 13 संघांपैकी 12 व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने 2016 मध्ये झिम्बाब्वेचा शेवटचा दौरा केला होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले होते.


भारतीय टीमचा विंडीज दौरा
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या 22 जुलैला वेस्टइंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 वन डे आणि 3 टी-20 खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना होईल.