मला स्वप्नातंही वाटलं नव्हतं की...; कर्णधार रोहित शर्मा भावूक!
रोहितने नुकतीच बीसीसीआय टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आला.
मुंबई : रोहित शर्मा आता टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार आहे. कर्णधार म्हणून रोहितची चांगली सुरुवातही झाली आहे. श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिल्यानंतर पहिल्या टेस्ट सामन्यातही विजय मिळवला आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात एक डाव आणि 222 रन्सनी इंडियाने विजय मिळवला आहे.
रोहित शर्माकडे टी-20 आणि वनडेचं फॉर्मेटचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर विराटने टेस्टच्या कर्णधापरदाचाही राजीनामा दिला. यानंतर टेस्टच्या कर्णधारपदाची धुराही रोहितकडे देण्यात आली. त्यामुळे रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. रोहित शर्माला भारताचा कर्णधारपद मिळणं हा मोठा सन्मान आहे. यासाठीच रोहितने नुकतीच बीसीसीआय टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आला.
रोहितने इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे की, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार बनेन. टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवणं आणि या यादीचा एक भाग बनणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी रोहितला भारताचा 35वा कसोटी कर्णधार बनवण्यात आलं होतं.
कर्णधार म्हणून रोहितने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग सामने आणि मालिका जिंकल्या आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतंच एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकली. त्याचबरोबर यानंतर टी-20 मालिकेतही श्रीलंकेचा पराभव झाला. त्यानंतर आता भारताची नजर कसोटी मालिका जिंकण्यावर आहे.