केपटाऊन : सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना केपटाऊनमध्ये सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडिया 223 धावांवर गारद झाली. कर्णधार विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. अशा स्थितीत टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आपला फलंदाजांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले आहेत.


फलंदाजांवर भडकले कोच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी मंगळवारी सांगितलं की, "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीची कामगिरी अत्यंत खराब होती." विराट कोहलीला ऑफ-साइड गेममध्ये शिस्तबद्ध राहण्याचा फायदा झाला. कोहलीने 79 रन्सची संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. पण भारतीय संघ पहिल्या डावात 223 धावांवर गारद झाला.


सामन्यानंतर राठोड म्हणाले, "कोहली ज्या प्रकारे फलंदाजी करत होता त्याबद्दल कोणतीही चिंता नव्हती. तो नेहमीच चांगली फलंदाजी करतो. 


एक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मला वाटतं, "तो चांगली फलंदाजी करत नाहीये याची मला कधीही काळजी वाटली नाही. तो नेट्स आणि सामन्यामध्ये चांगला खेळताना दिसला."


ते म्हणाले, "आज एक चांगली संधी होती, तो मोठ्या इनिंगमध्ये रूपांतर करू शकला असता. तरीही तो ज्या पद्धतीने खेळला त्यामुळे मी त्याच्यावर खूश होतो. ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. रन्स करणं सोपं नसतं. आम्ही खूप खराब खेळलो. आम्ही आणखी 50-60 रन्स करू शकलो असतो."