निडास ट्रॉफी जिंकली तरी टीम इंडियाचं नंबर १ बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही
भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. ही टी-२० ट्राय सीरिज असणार आहे.
नवी दिल्ली : भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. ही टी-२० ट्राय सीरिज असणार आहे.
नंबर एक बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही
या सीरिजमध्ये अनेक सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. पण, टीम इंडियाने ही सीरिज जिंकली तरी टी-२० मध्ये नंबर एक बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाहीये.
आयसीसीच्या रँकिंग प्रेडिक्टरच्या मते, टी-२० मध्ये टीम इंडियाचं नंबर वन बनण्याचं स्वप्न सध्या पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.
टीम इंडियाला एका गुणाचा फायदा
टीम इंडियाने आफ्रिकेला टी-२० सीरिजमध्ये २-१ ने पराभूत केलं. त्यामुळे भारताला एका गुणाचा फायदा झाला तर आफ्रिकेने एक गुण गमावला. सध्या भारत आणि आफ्रिका हे क्रमश: तिसऱ्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर
टी-२० मध्ये टीम इंडिया १२२ गुणांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १२६ आणि ऑस्ट्रेलिया १२६ गुणांसह क्रमश: पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी रँकिंग प्रेडिक्टरच्या मते, जर टीम इंडियाने फायनल मॅचसोबत पाचही मॅचेस जिंकल्या तर एका गुणाचा फायदा होईल. त्यामुळे १२३ गुण मिळवत टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर दाखल होईल.
...म्हणून टीम इंडियाला फायदा होणार नाही
भारतीय टीमने जर ट्राय सीरिज जिंकली तर त्याच्या रँकिंगमध्ये जास्त सुधारणा होणार नाही. याचं कारणं असं की टीम इंडिया ट्राय सीरिजमध्ये ज्या टीम विरोधात खेळत आहे त्यांची रँकिंग खूपच खराब आहे. श्रीलंका ८व्या स्थानावर तर बांगलादेश १०व्या स्थानावर आहे.