मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं पाच वनडेच्या सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍन्टीगामध्ये झालेल्या या वनडेमध्ये टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा नवा रेकॉर्ड झाला आहे. परदेशी जमिनीवर टीम इंडियाची ही ६००वी वनडे होती. परदेशी जमिनीवर सगळ्यात जास्त वनडे खेळण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर आहे.


पाकिस्ताननं आत्तापर्यंत परदेशी जमिनीवर ७०० वनडे खेळल्या आहेत. यापैकी ३५४ मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय आणि ३२५ मॅचमध्ये पराभव झाला आहे. टीम इंडियानं परदेशी जमिनीवर खेळलेल्या ६०० मॅचपैकी २८१ मॅचमध्ये विजय आणि २८३ मॅचमध्ये पराभव झाला आहे.


टीम इंडियानं आत्तापर्यंत ९१५ वनडे खेळल्या आहेत. यापैकी ४६४ मॅचमध्ये विजय तर ४०४ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४० मॅचचा कोणताही निर्णय लागला नाही. घरच्या मैदानावर टीम इंडियानं ३१५ वनडे खेळल्या आहेत. यातल्या १८३ वनडेमध्ये त्यांना विजय आणि १२१ मॅचमध्ये पराभव पदरी पडला आहे. दोन मॅच ड्रॉ आणि ९ मॅचचा निर्णय लागू शकला नाही.