Suryakumar Yadav injury : टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुची बाबू स्पर्धेतील मुंबई विरुद्ध मिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन यांच्यातील सामन्यादरम्यान सूर्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. बांगलादेशविरुद्धची टेस्ट सिरीज तोंडावर असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याने आता सिलेक्शन कमिटीच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुची बाबूला स्पर्धेत शनिवारी तामिळनाडूविरुद्ध फिल्डिंग करताना सूर्याच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र दुखापतीची तीव्रता अद्याप कळू शकलेली नाही. सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकेल की नाही? असा सवाल देखील आता विचारला जात आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरूवात होणार असून सूर्या सी टीमचा भाग आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सूर्याच्या दुखापतीबद्दल अजून काहीही माहिती दिली नाहीये. मात्र, तो दुलीप स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आलीये.


सूर्याला खेळायचंय टेस्ट क्रिकेट


"रेड बॉल क्रिकेटला नेहमी माझं प्राधान्य राहिलं आहे. जेव्हा मी मुंबईच्या मैदानवर लहानाचा मोठा झालो आणि अनेक स्थानिक क्रिकेट खेळलो. मी 10 वर्षांहून अधिक काळ अनेक प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे आणि मला अजूनही या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा आनंद मिळतो. म्हणून मी दुलीप करंडक स्पर्धेपूर्वी बुची बाबू स्पर्धा खेळायला आलोय", असं सूर्यकुमार यादव म्हणाला होता. "मी डोमेस्टिक्स खेळेन आणि बघू काय होते. मला रेड बॉल क्रिकेट खेळायला आवडतं आणि भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळू इच्छितो", असंही सूर्या म्हणाला होता. 


दुलीप ट्रॉफीसाठी सी संघ


ऋतुराज गायकवाड (C), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (WK), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल, संदीप वारियर.